आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:तरुण मुलाने डोक्यात कुऱ्हाड घालून केला आईचा खून, तरीही राग शांत न झाल्याने दगड उचलून छातीत मारला

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेजाऱ्यांनी आरोपी रमेश भिकाजी घुगे याला पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले

वृद्ध वडील घराबाहेर बसलेले असताना तीस वर्षीय मुलाने घरात ७५ वर्षीय आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. बुधवारी संध्याकाळी बाळापूर गावात ही घटना घडली. याप्रकरणी शेजाऱ्यांनी रमेश भिकाजी घुगे याला पकडून ठेवत पोलिसांच्या हवाली केले.

शशिकला भिकाजी घुगे (७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. तीन मुले व तीन मुली असलेल्या शशिकला व त्यांचे पती भिकाजी गावातच वेगळे राहत होते. दोन मुले गावात तर रमेश पत्नीसह शिवाजीनगर मध्ये राहत हाेता. त्यांचे एक नाईकनगर मध्ये देखील घर असून ते भाड्याने दिलेले होते. दोन महिन्यांपासून रमेशची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे रमेश अशात गावाकडेच शेती करत होता. बुधवारी संध्याकाळी त्याचे वडील घराबाहेर बाजेवर बसलेले असताना रमेशने घरात जाऊन आईशी वाद घालत थेट कुऱ्हाड आईच्या डोक्यात घातली. आईच्या ओरडण्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली असता रमेश रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन उभा होता. शेजाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रमेशचा राग शांत झालेला नव्हता. त्याने त्यातही दगड उचलून आईच्या छातीत मारला. त्यानंतर त्याला इतरांनी दोरीने बांधून ठेवत चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल, सहायक निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रमेशला ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्यात आले, तर शशिकला यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.