आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद -बीड आणि औरंगाबाद- नगर -पुणे या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल. हा नवा रेल्वेमार्ग झाल्यास औरंगाबाद- मनमाड- दौंड- पुणे हे अंतर कमी होईल.
भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी या दाेन्ही मार्गांसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर गोयल यांनी मार्गाच्या सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या. यानंतर मध्य रेल्वेचे वरिष्ठ मुख्य अभियंता रॉय, उपमुख्य व्यवस्थापक सुरेश जैन, गुजराल, दमरेचे कार्यकारी अभियंता निमजे आदींनी डॉ. कराड यांची भेट घेत मार्गाविषयी सविस्तर माहितीही दिली. पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष सर्व्हेचे काम सुरू होईल, असे मध्य रेल्वेचे जैन यांनी सांगितले. या वेळी औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी व सीएमआयचे शिवप्रसाद जाजू, कमलेश धूत, सतीश लोणीकर यांची उपस्थिती होती. त्यांनी औरंगाबादची कारखानदारी व औद्योगिक मालवाहतूक याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली.
१८७० कोटी रुपये खर्च
एकूण १८७० कोटी रुपये खर्च असलेला औरंगाबाद- नगर रेल्वेमार्ग पहिल्या टप्प्यात पूर्ण केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात नगर ते पुणे असे काम होईल. औरंगाबाद, वाळूज, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, सुपा या शहरांना या मार्गात स्थान मिळेल. या मार्गात प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीस प्राधान्य दिले जाईल. या नवीन मार्गामुळे वाळूज, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होईल. विशेषत: मालवाहतुकीच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर ठरेल, असे डाॅ. कराड यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.