आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:कोरोनामुक्त पोलिसाच्या घरी 'बाप्पा' घेऊन पोहचले एसपी, कुटुंबाला सुखद धक्का

परळी5 महिन्यांपूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक
  • हर्ष पोद्दार यांच्याकडून सरप्राइज, केली बाप्पाची स्थापना

चेक नाक्यावर ड्युटी करताना कोरोनाबािधत झाल्यावर उपचारानंतर कोराेनामुक्त झालेल्या परळीतील पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी शनिवारी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने एसपी हर्ष पोद्दार थेट गणपती बाप्पांची मुर्ती घेऊन पाेहचले. त्यांनीच या कर्मचाऱ्याच्या घरी बाप्पांची स्थापनाही केली. थेट एसपीच आपल्या घरी आल्याने कर्मचारी व कुटुंबाला सुखद धक्का बसला.

बीड पोलिस दल सध्या कोरोनाच्या लढाईत पहिल्या फळीवर काम करत आहे. अनेक पोलिस कर्मचारी कोरोना ड्युटी करताना बाधित झाले. एसपी हर्ष पोद्दार यांच्याकडून त्यांची विचारपूस हाेत असते. परळीतील एक पोलिस कर्मचारी चेक नाक्यावर ड्युटी करताना बाधित झाला होता. उपचारानंतर बरा होऊन तो घरी परतला, त्याचा क्वारंटाईन कालावधी संपून तो कामावर रुजू झाला.

शनिवारी गणेश स्थापनेच्या निमित्ताने एसपी हर्ष पोद्दार हे या कर्मचाऱ्याच्या पोलिस वसाहतीमधील घरी थेट गणपती बाप्पा घेऊन् पोहचले. त्यांच्यासोबत अंबाजोगाई उपविभागाचे डीवायएसपी राहुल धस, पोलिस बाॅइज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले होते. पोद्दार यांनी आपल्या हस्ते या कर्मचाऱ्याच्या घरात गणेश स्थापना केली, पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती विषयक व कुटुंबियांशीही इतर अडचणींबाबत चर्चा केली. एसपी आपल्या घरी आल्याने या कुटुंबाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला हाेता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser