आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाे-खो लीग:स्पर्श, पद्मावती अटॅकर्स विजयी

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर खो-खो संघटना व अजित सीड्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा खो-खो प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या साखळी सामन्यात स्पर्श डिफेंडर आणि पद्मावती अटॅकर्स संघांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात दिशा इंगळे आणि आकांक्षा क्षीरसागर सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.

पहिल्या लढतीत स्पर्शने (१५) समर्थ टायगर्स (१४) संघावर १ गुण व २:१० मिनिटे राखून विजयी मिळवला. स्पर्शच्या ओम लोंढेेने १:३० मी. संरक्षण केले, निल जावळेने २:१० मी. संरक्षण केले. स्वरूप सुरडकरने आक्रमणात २ गडी, तनिष्का देवगिरीकरने १.१० मी संरक्षण केले व आक्रमणात १ गडी मारला. शर्वरी भगतने १:१० मी. संरक्षण केले, अष्टपैलू आकांक्षा क्षीरसागरने १:३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले. दुसरीकडे, समर्थ टायगर्सकडून दिव्या बोरसेने १:३० मी. संरक्षण केले, भीम सोनटक्केने आक्रमणात ३ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात पद्मावती अटॅकर्सने (१४) गोदावरी लायन्स (१३) संघावर एका गुणाने मात केली. पद्मावतीकडून यश मोरे २.३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ३ गडी बाद केले, आनंदी मामुर्डेने २.१० मी. व आकांक्षा हरकळने २.१० मी. संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले, पायल रोत्रेने २:२० मी. व आक्रमणात २ गडी बाद केले. गोदावरीकडून मृणाल जोगदंडने १.१० मी. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...