आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद:घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांची उस्मानाबादेत पळवापळवी ; शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबादेत नव्याने सुरू होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर, लातूर, अंबाजोगाई आणि औरंगाबाद येथील २८ तज्ज्ञ डॉक्टरांना तिकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयात मात्र रुग्णांवर उपचार करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या हे निदर्शनास आणून दिले. त्यावर न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी सहायक प्रोफेसर, प्रोफेसर आणि डीनच्या नियुक्तीसंबंधी राज्य शासनाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच घाटी येथे औषधी उपलब्ध होत नसल्याप्रकरणीही २१ सप्टेंबरपर्यंत शपथपत्र देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

घाटीत सुविधा आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जन डॉ. आशिष भिवापूरकर यांना प्रतिवादी करण्याची विनंती यापूर्वी इम्तियाज यांनी केली होती. ती खंडपीठाने मंगळवारी (६ सप्टेंबर) मान्य केली. घाटी येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ उस्मानाबादेत गेले आहेत, त्यामुळे या आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टर नाहीत, याकडेही खासदारांनी लक्ष वेधले. त्यावर डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

बातम्या आणखी आहेत...