आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आहा हेरो’ गाणे प्रदर्शित:‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘गुणगुण’ हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. ‘गुणगुण’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘घर बंदूक बिर्याणी’तील आणखी एक गाणे झळकले आहे. नुकताच ‘घर बंदूक बिर्याणी’चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला.

दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘आहा हेरो’ या गाण्यात ‘घर बंदूक बिर्याणी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...