आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी सांगितले.:जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला गती

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. मराठवाड्याची क्रीडा राजधानी असलेल्या औरंगाबादमधील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासकामाला गती देण्याचा माझा प्रयत्न राहील. क्रीडा संकुल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी अहोरात्र काम करणार असल्याचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी सांगितले.

क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि राज्य शासनातर्फे औरंगाबाद जिल्हा क्रीडाधिकारीपदी चंद्रशेखर घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी घुगे यांची नियुक्ती झाली. घुगे हे व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते.

बातम्या आणखी आहेत...