आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:गतिमंद मुलीचा‍ विनयभंग, बसचालकास 3 वर्षे शिक्षा; एक लाख रुपयांचा दंड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन गतिमंद मुलीचा‍ विनयभंग करतानाचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करणाऱ्या नराधम बसचालकाला ३ वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली १ लाख २ हजार २०० रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. अविनाश कैलास शेजूळ (१९, रा. फुलेनगर, पंढरपूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात विशेष मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिकीने फिर्याद दिली. १७ जानेवारी २०२० रोजी त्यांना एका व्हाॅट्सअॅपवर व्हिडिओ व्हिडिओ पाठवला. ताे पाहिला असता त्यात त्यांच्याच शाळेतील बसचालक शेजूळ हा दोन मित्रांसह आठ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण करताना दिसला.

त्यानंतर मुख्याध्यापिकेने ही माहिती पीडितेचे आई-वडील व शाळेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. १८ जानेवारी २०२० रोजी आरोपी शेजूळ याला घटनेचा जाब विचारला असता १६ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना सोडायला जाताना बसमध्ये िव्हडिअाे बनवल्याचे सांगितले. आरोपी अाम्हाला कापून टाकण्याची धमकी देत हाेता, असे काही मुलांनी सांगितले. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी फिर्यादीसह पीडिता आणि तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची साक्ष नोंदवली.

एक लाख रुपयांचा दंड
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी शेजूळ याला दोषी ठरवून भादंवि कलम ३५४, पोक्सोचे कलम ८ व १२ अन्वये प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड, आणि बालकांचे न्याय हक्क संरक्षण कायद्यान्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. प्रकरणात अॅड. शिरसाठ यांना अॅड. तेजस्विनी जाधव आणि पैरवी अधिकारी रज्जाक शेख यांनी साहाय्य केले.

बातम्या आणखी आहेत...