आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश-जगाच्या सकारात्मक परंपरा:निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा...

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपीय देश डेनमार्कमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, वेळ घालवणेदेखील एक परंपरा आहे. निसर्गावर प्रेमाला लोक friluftsliv (फ्री-लुफ्ट्स-लिव्ह) म्हणतात. त्याचा अर्थ मोकळ्या हवेत श्वास घेणे किंवा मोकळ्या हवेत जगणे आहे. येथे एक म्हण आहे की, खराब हवामान असे काहीही नसते, कपडे त्यासाठी अनुकूल नसतात. ही परंपरा जवळपास १०० वर्षांपासून सुरू आहे.

डेनमार्कमध्ये फ्री-लुफ्ट्स-लिव्ह लोकप्रिय बनवण्याचे श्रेय नाटककार आणि कवी हेनरिक इबसेन यांना जाते. निसर्गात वेळ घालवण्याचे महत्त्व दाखवण्यासाठी त्यांनी हा शब्द वापरला. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे चांगले राहते हे त्यांनी सांगितले होते. आज लोक बागेत दुपारचे जेवण करतात, हिवाळ्यात बर्फात स्कीइंग करतात.

डेनमार्कमधील काही कंपन्या तर प्रत्येक बुधवारी कर्मचाऱ्यांना ९० मिनिट कामातून सुटी देते. जेणे करुन ते निसर्गाच्या सान्निध्यात राहु शकतील. काही कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यासाठी इंसेंटिव्ह देतात. डेनमार्कच्या व्यतिरिक्त नॉर्डिक देशात निसर्गाच्या सान्निध्यात लाेक वेळ घालवतात. सर्वेक्षणाच्या मते, स्वीडनमध्ये एक तीतृआंश लोक आठवड्यातुन एकदा तरी बाहेर जातात.

बातम्या आणखी आहेत...