आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठदुखीचा त्रास:घाटीत महिलेच्या मणक्यावर दुर्बिणीद्वारे केली शस्त्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात काम करणाऱ्या उज्ज्वला दाभाडे यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाय व पाठदुखीचा त्रास होता. त्यांच्यावर घाटीच्या अस्थिरोग विभागाचे डॉ. अनिल धुळे यांनी दुर्बिणीव्दारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली. आता त्यांचा त्रास कमी झाला असून त्या चालू लागल्या आहेत.जाफराबाद येथील दाभाडे यांना शेतीचे काम करताना, ओझे उचलताना पाठ आणि पाय दुखण्यास सुरुवात झाली. त्यांना चालणे अशक्य हाेऊ लागले. अनेकदा एकाच ठिकाणी अर्धा ते एक तास थांबल्यानंतर पुढचे पाऊल टाकता येत हाेते. त्यामुळे त्या घाटीत दाखल झाल्या.

रुग्णांमध्ये अनेक गैरसमज : डॉ. धुळे म्हणाले, मणक्याच्या त्रासाविषयी लोकांचे अनेक गैरसमज असतात. अनेकांना वाटते की मणक्यात त्रास असला आणि ऑपरेशन केले की पुन्हा चालता येणार नाही. त्यामुळे असे रुग्ण त्रास सहन करतात. आम्ही गेल्या महिनाभरात दुर्बिणीच्या माध्यमातून चार बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या. उज्ज्वला यांना चालण्यास त्रास होत होता. त्यांच्या मणक्यामध्ये त्रास होत होता. आता त्यांना चालण्यास कुठलीही अडचण नाही. शस्त्रक्रियेनंतर ५ दिवसांत रुग्ण घरी जातो. त्यामुळे रुग्णांनी न घाबरता उपचार घ्यावेत.

बातम्या आणखी आहेत...