आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी संघटनेमध्ये फूट पडली आहे. दोनच व्यक्ती अनधिकृतपणे संघटना चालवत असल्याचा आरोप करत जिल्हा कबड्डी संघटनेची नवीन कार्यकारिणी महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जाहीर करण्यात आली. श्रीमती वेणुताई चव्हाण कन्या प्रशाला सिडको येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
गत महिन्यात १ मार्च रोजी जिल्हा कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. या दोन्ही कार्यकारिणीमध्ये मार्गदर्शकांनी घरच्या व्यक्तींना संधी दिली. दुसऱ्या कार्यकारिणीसोबत तालुका सदस्य, क्लब, मंडळाचे सदस्य व मूळ संघटनेतील १८ पैकी ८ सदस्य असून २ जण मृत झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कार्यकारिणीचे वजन वाढले आहे. सोमवारी नूतन कार्यकारिणी आपला चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्त कार्यालयात जमा करणार आहे.
नूतन कार्यकारिणी कार्याध्यक्ष प्रसन्ना पाटील, उपाध्यक्ष मूलचंद पवार, अप्पासाहेब लघाने, सतीश वैराळकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, कार्यवाह युवराज राठोड, सहकार्यवाह जालिंदर गटकळ, सदस्य मोहंमद बिन हसन हिलाबी, वामन सराफ, रावसाहेब आधाने, चंद्रशेखर चौधरी, डॉ. सविता दाभाडे, सोनी जायभाये, जयंत शिसोदे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.