आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका वेगळ्या धाटणीच्या, अज्ञात कवयित्रींच्या अभंग गायनाच्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. ४ जून रोजी यशोमंगल कार्यालयात झालेल्या “येई वो विठ्ठले’ कार्यक्रमात वेणाबाई, आऊबाई, निर्मळा, भागू आदी संत कवयित्रींच्या अभंगांचे संगीत व गायन संध्या देशमुख यांनी केले. डॉ. मंगला वैष्णव यांनी आध्यात्मिकतेबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब, संत कवयित्रींच्या रचनांवर कसे पडले हे निवेदनातून सांगितले. विदुषी शुभदा पराडकर यांचे स्वागत उषा नाईक यांनी केले. पंडित विश्वनाथ ओक, पंडित विजय देशमुख यांचे स्वागत डॉ. सौरभ देशमुख यांनी केले. संध्या देशमुख यांनी संगीतबद्ध केलेल्या “तुकोबाचा छंद’, “डोईचा पदर’ आणि “ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या अभंगांना रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमात “संत कृपा झाली, इमारत फळा आली’ या भैरवीने कार्यक्रमाचा कळस गाठला. कार्यक्रमाला उत्तम साथ संगत संवादिनी-जयंत नेरळकर, तबला-योगीराज पांडे, पखवाज-गणेश भुतेकर, बासरी-निरंजन भालेराव, तानपुऱ्यावर नारायणी पांडे यांनी साथ दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.