आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चमध्ये रॅँकिंग स्पर्धा होणार:औरंगाबादेत लवकरच स्पोर्ट्स सायन्स सेंटर; टेनिस संघटनेचा पुढाकार, स्थानिक स्पर्धेतून रॅँकिंग

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने औरंगाबादेमध्ये स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुरू हाेणार आहे. टेनिससह इतर खेळांच्या खेळाडूंनाही फायदा होईल. डिसेंबरपर्यंत हे सेंटर सुरू होऊ शकते. त्यासाठी नियोजन करण्याची प्रकीया सुरू असल्याची माहिती राज्य लॉन टेनिस संघटनेचे सरचिटणीस सुंदर अय्यर यांनी विभागीय क्रीडा संकुलात पत्रकार परिषदेत दिली.

सर्वाेत्तम सुविधा उपलब्ध
खेळाडूंवर परिणाम करणारी सर्वात मोठी गोष्टी म्हणजे दुखापत. दुखापतीमुळे खेळावर परिणाम होत असल्याने खेळाडूचे करिअर पणाला लागते. त्यामुळे खेळाडूंचा विचार करून औरंगाबादेमध्ये स्पोर्ट््स सायन्स सेंटर सुरू करण्याचा संघटनेचा मानस आहे. येथे रिहॅब, न्यूट्रिशियन, आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. डिसेंबरमधील आयटीएफ स्पर्धेदरम्यान खेळाडूंना ही सेवा मिळेल. काेचसाठी प्रशिक्षणाच्या कार्यशाळेचेदेखील आयोजन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मार्चमध्ये रॅँकिंग स्पर्धा होणार :
स्थानिक युवा खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्च महिन्यापासून नाशिक, सोलापूर, पुणे, मुंबईसह औरंगाबादमध्ये विविध वयोगटातील १० रॅँकिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिली स्पर्धा पुढील महिन्यात औरंगाबादमध्ये होईल. कोरोनामुळे खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नसल्याने त्याचे नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाईल. त्यातून दर्जेदार खेळाडू मिळतील. स्पर्धेला परवानगी मिळाल्यानंतर कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे अय्यर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...