आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:तब्बल 86 लाखांचा गंडा घालणाऱ्या संस्थेला क्रीडा विभागाने दिले मैदान!

औरंगाबाद | एकनाथ पाठक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या प्रवेश फीचे पैसे परस्पर खिशात घालून २०१८ मध्ये आग्रा येथील स्कूल गेम्स आॅफ फेडरेशनने (एसजीएफआय) यजमान महाराष्ट्र क्रीडा विभागाची तब्बल ८६ लाखांची फसवणूक केली. मात्र, अशा प्रकारे लाखोंचा गंडा घालणाऱ्या याच एसजीएफआयला आता निवड चाचणी स्पर्धा आयाेजनासाठी महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त आेमप्रकाश बकाेरिया यांनी पुण्याच्या बालेवाडीतील मैदान उपलब्ध करून दिले. मात्र, या निवड चाचणीनंतर स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या स्पर्धेला या एसजीएफआयला केंद्र सरकारची मान्यता नाही. फ्रान्समधील याच स्पर्धेसाठी निवड चाचणीला रविवारपासून पुण्यात सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील पालक आणि खेळाडूंची दिशाभूल केली जात आहे. देशभरात चार ठिकाणी या निवड चाचणीचे आयाेजन करण्यात आले. यामधील तीन ठिकाणी खाजगी ठिकाण निवड चाचणी हाेणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील निवड चाचणी ही शासनाच्या मैदानावर आयाेजित करण्यात अाली. या स्पर्धेत तब्बल ७ खेळ प्रकारांचा समावेश आहे. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयाेजन केले जात आहे. याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी यावर काेणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

शासनाचे खेळाडू बाहेर : केंद्र सरकारने पुण्यात हाेणारी एसजीएफआयची स्पर्धा ही अनधिकृत असल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे याबाबत खबरदारी घेत क्रीडा आयुक्तांनी शासनाचे खेळाडू व काेच या स्पर्धेत सहभागी न करण्याचा निर्णय घेतला.

आआमच्याकडे जागतिक फेडरेशनचे पत्र : सचिव
आमच्याकडे जागतिक फेडरेशनचे पत्र आहे. त्यामुळे आम्ही निवड चाचणीचे आयाेजन करत आहे. यातून आमचा संघ फ्रान्स येथील स्पर्धेत सहभागी हाेणार आहे, अशी प्रतिक्रीया अध्यक्ष रणजीत कुमार यांनी दिली.

केंद्राचा ठपका; आयाेजन चुकीचे : सचिव
केंद्राने स्पर्धेच्या आयाेजनावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे पुण्यातील बालेवाडीतील निवड चाचणीचे स्पर्धेचे हाेणारे आयाेजन चुकीचे आहे. यातून पालक व खेळाडूंचे नुकसान हाेणार आहे, अशी प्रतिक्रीया एसजीएफआयचे सचिव विजय संतान यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...