आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत क्रीडा महोत्सव उत्साहात:खेळात फक्त स्पर्धा म्हणून पाहू नका, तर मेहनत-जिद्दीने माणूस बनण्याची कला शिका - ठोंबरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 42 वा क्रीडा महोत्सव उत्सहात संपन्न झाला. धर्मवीर संभाजी विद्यालय, एन 5 सिडको येथे झालेल्या स्पर्धेत 2000 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत यजमान धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ‘हा संस्थेचा क्रीडा महोत्सव असून तो आनंदानेच साजरा झाला पाहिजे. खेळात फक्त स्पर्धा म्हणून पाहू नका, तर मेहनत आणि जिद्दीने माणूस बनण्याची कला शिका, असा सल्ला संस्थेचे माजी सचिव डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी दिला. ते स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होतो.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष देवजी पटेल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्यामसुंदर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेतंर्गत सर्व विद्यालयातील मुला-मुलींच्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब, व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या माजी राष्ट्रीय सुवर्णपदक खेळाडू सलोनी बावणे, मयुरी पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून झाले.

यावेळी संस्थेचे संचालक सुरेश पठाडे, प्राचार्य नारायणराव भूळगावकर, पर्यवेक्षक दिलीप गायके, राष्ट्रीय खेळाडू प्रशांत जमधाडे, साईचंद्र वाघमारे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख विनायक राऊत यांनी केले.

स्पर्धेचा सांघिक निकाल पुढीलप्रमाणे :

खो -खो मुली - धर्मवीर संभाजी विद्यालय (प्रथम), स्वामी विवेकानंद विद्यालय (द्वितीय). मुले - धर्मवीर संभाजी विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय. कबड्डी मुली - संत सावता विद्यालय, फुलंब्री व स्वामी विवेकानंद विद्यालय, चित्तेपिंपळगाव. मुले - संत सावता विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय. व्हाॅलीबाॅल मुली - स्वामी विवेकानंद विद्यालय, धर्मवीर संभाजी विद्यालय. मुले - जून्नेश्वर विद्यालय, वरूड व धर्मवीर संभाजी विद्यालय. 14 वर्षाखालील कबड्डी मुले - संत भगवान बाबा आश्रम शाळा, जालना व संत गाडगेबाबा आश्रम शाळा, अंजनडोह. खो-खो मुले - संत गाडगेबाबा आश्रम शाळा व धर्मवीर संभाजी विद्यालय. मुली - संतगाडगे बाबा आश्रम शाळा व धर्मवीर संभाजी विद्यालय.

बातम्या आणखी आहेत...