आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या २२ विद्यापीठातून आलेल्या १००३ मुलीसह २१२० खेळाडूं व ३०२ प्रशिक्षकांच्या उपस्थितीत शनविारी राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवास विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ज्योत पेटवून उद्घाटन केले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, पद्मश्री धनराज पिल्ले, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ आदींची उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांनी ध्वजारोहण केले. या महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स या पाच क्रीडा प्रकारात चार दविस स्पर्धा रंगणार आहे.
खेळाडूंनी पाहुण्यांसमोर पथसंचलन केले. कुलसचवि डॉ. भगवान साखळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख, क्रीडा शिक्षक अमृत बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी आभार मानले.सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत : उद्घाटन कार्यक्रमानंतर उस्मानाबाद उपकेंद्रातील विद्यार्थिनी जिजाऊ कोलतेने बहारदार शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संघाने सामूहिक आदविासी नृत्य सादर केले. दिग्दर्शक व गायक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात हे नृत्य सादर झाले. सागर जोशी यांनी संगीत दिले. यात हेमलता धामुणे, दुर्गेश्वरी अंभोरे, मानसी पवार, साधना विटोरे, साधना इंगळे, वैभव पैठणे, शुभम निसर्गन, सचिन शिंदे, सागर सोनवणे, दिलीप पंडागळे यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थरारक मल्ल खांबावर कसरती सादर केल्या.
विद्यापीठाच्या क्रीडा मशालीने पहिल्यांदाच केला ६०० किमीचा प्रवास राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवादरम्यान यंदा प्रथमच क्रीडा मशाल रॅली आयोजित केली होती. ही क्रीडा ज्योत तब्बल ६०० किलोमीटरचा प्रवास करत शनविारी औरंगाबादेत दाखल झाली होती. त्यानंतर क्रांती चौक ते विद्यापीठ असा मार्गक्रम करत क्रीडा ज्योत दुपारी विद्यापीठाच्या मैदानात पोहोचली. या रॅलीत २५० जणांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे बोधचिन्ह असलेल्या चालत्या-फिरत्या बिबट्याने सर्वांचे लक्ष वेधले. या वेळी अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फीही घेतले. ही ज्योत ८ डिसेंबरपर्यंत खेळाडू, रसिकांच्या मनात ऊर्जेचे स्रोत तेवत ठेवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.