आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या ऊर्जेचा स्त्रोत असलेली ‘क्रीडा मशाल’ तुळजापूरच्या भवानी मंदिरातून पेटवण्यात आली. ही रॅली चार जिल्हयातून जाणार असून बीड जिल्ह्यात उत्साहत गुरुवारी प्रवेश केला. यावेळी माेठ्या संख्येने खेळाडू, प्रशिक्षक, नागरिकांनी सहभाग घेतला होता.
राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या मशाल रॅलीचे आगमन सकाळी 8.00 वाजता वाजता बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात झाले. यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थितांना खेळ व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर बीड शहराच्या विविध भागातून ही मशाल रॅली काढण्यात आली. लहान मुलापासून जेष्ठापर्यंत नागरिक रॅलीत धावले.
या रॅलीत बीडच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्राचार्य डॉ. सविता शेटे, प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, डॉ.विश्वास कदम, मिलीया डॉ. एस. हुसैनी, तसेच बीड जिल्ह्याचे मशाल प्रमुख डॉ. सय्यद हनीफ, डॉ. भालचंद्र सानप, डॉ. जगन्नाथ दत्तापूर, डॉ. शंकर धांडे, डॉ. बाळासाहेब सरपाते, डॉ. संतोष वनगुजरे, डॉ. ज्योती गायकवाड, डॉ. कृष्णा जाधव, डॉ. छत्रपती वैरागर, डॉ. प्रवीण शिलेदार व बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, तसेच विद्यापीठ मशाल रॅलीचे डॉ. संदीप जगताप, डॉ. भुजंग डावकर, डॉ. पांडुरंग रणमाळ गणेश जाधव कृष्णा भले व जावेद शेख उपस्थिती होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाचा पाश्वभुमीवर तुळजापूर ते औरंगाबाद या दरम्यान ‘क्रीडा मशाल रॅली’ आयोजन करण्यात आले आहे, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून क्रीडा महोत्सवाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. चार जिल्ह्यात प्रवास करुन ही ज्याेत 2 डिसेंबर राेजी सकाळी जालना शहरात पाेहाेचेल व त्याच रात्री औरंगाबाद शहरात मुक्कामी दाखल होईल. त्यानंतर 3 ते 7 डिसेंबरदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित 24 व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवासाठी बुधवारी सकाळी मशाल रॅली निघेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.