आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:खेळाडूच आता उद्याचा सशक्त भारत घडवू शकताे : किशोर शितोळे

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी खेळाच्या सरावात खंड न पडू देता सातत्य ठेवले तर निश्चितच यश मिळते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची उत्तम जडणघडण होते आणि खेळाडूच उद्याचा सशक्त भारत घडवू शकतात, असे प्रतिपादन विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य किशोर शितोळे यांनी केले. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि अॅडव्होकेट स्पोर्ट््स अँड कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हैदराबाद मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धेच्या उद्घाटनदरम्यान शितोळे बोलत होते. हा सोहळा सभुच्या मैदानावर पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गरवारेचे पाठक, शुभम दातखोरे, कमलसिंग सूर्यवंशी, कलीम खान, अॅड. गणेश अनसिंगकर, अॅड. गोपाल पांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संकर्षण जोशी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...