आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या श्रीगुरुजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पहिल्यांदाच औरंगाबादेत झाले आहे. यामध्ये महिला सबलीकरणासाठी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पद्मश्री डॉ. क्षमाजी मेत्रे यांना तर पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल अमूल संस्थेला पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाखाचा रोख पुरस्कार, शाल-श्रीफळ असे स्वरूप असलेला हा पुरस्कार सोहळा १२ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता ‘वंदे मातरम’ सभागृहात होणार आहे.
याविषयीची माहिती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर आणि औरंगाबादचे अध्यक्ष गाेर्वधन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.अग्रवाल म्हणाले, राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील श्री गुरुजी पुरस्कार दिला जातो.
महिला सबलीकरण व पर्यावरण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांची निवड केली जाते. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य महाराज देगलूरकर आणि प्रमुख वक्ता म्हणून पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबादच्या कुलपती इंदुमतीताई काटदरे उपस्थित राहणार आहेत.डाॅ. साताळकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर, श्री गुरुजी यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार देण्यात येतो. १९९६ पासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.