आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरपी:दोन वर्षांपूर्वी रद्द झालेली एसआरपी भरती 20 पासून

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अर्थात एमएसएससीने रद्द केलेली राज्य राखीव दलातील (एसआरपी) जवानांची भरती २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मार्च -एप्रिल २०२० दरम्यान ही भरती केली जाणार होती. पण कोरोनामुळे स्थगित केली होती. राज्यभरात सात हजार जागांसाठी १ लाख ३३ हजार ६९३ युवक यामध्ये सहभागी होतील.

नऊ जिल्ह्यांतील एसआरपीएफ केंद्रांवर भरती राबवली जाणार आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील राज्य राखीव दलाच्या मैदानावर ३७ हजार २२७ उमेदवार या भरतीत सहभागी होणार आहेत.

फेब्रुवारी २०२० दरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. पण त्यानंतर मार्चमध्ये कोरोना आल्याने ही प्रक्रिया स्थगित केली होती. पण आता पुन्हा अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांना ९ जिल्ह्यातील राज्य राखीव दलांच्या केंद्रावर चाचणीसाठी बोलवले आहे. औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, लातूर जिल्ह्यांतील १९,३२२ युवक औरंगाबादेत येतील. जालना, परभणी, हिंगोली, बीड व उस्मानाबाद येथील १७ ,९०५ युवक जालन्यातील एसआरपीएफमध्ये भाग घेतील. पुण्यात १३, ०५९ युवक सहभाग घेतील.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील बलगट पाचमध्ये सातारा, सोलापूर, नाशिकचे १७,१२६ युवक तर तेथीलच बलगट ७ मध्ये सांगली, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील १५,४६३ युवक सहभागी होतील.

धुळे येथे १८ हजार ८११ युवक नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत नोंदणी केलेले आहेत. नागपूरच्या एसआरपीएफ कॅम्पमधील चाचणीत नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतून ११,६७२ युवक सहभागी होतील. अमरावतीत १३ हजार ३३० युवक सहभागी होतील. अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम जिल्ह्यांतील युवक येथे चाचणी देऊ शकतील.

दररोज १५०० उमेदवारांची चाचणी
गर्दी होऊ नये म्हणून रोज १५०० युवकांनाच चाचणीसाठी बोलावले आहे. यापूर्वी शुल्कासह अर्ज केलेले युवकच सहभागी होऊ शकतील. जिल्हानिहाय यादी www.mahasecurity.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक कागदपत्रे, ऑनलाइन अर्जाची छायांकित प्रत, दोन फोटो सोबत बाळगणे आवश्यक आहे. काही कारणास्तव दिलेल्या तारखेत युवक सहभागी न झाल्यास पुढील तीन दिवस संधी देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...