आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीच्या लेकी:दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन आईने दिली दहावीची परीक्षा; छत्रपती संभाजीनगरच्या घटनेची एकच चर्चा

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून (२ मार्च) पासून सुरुवात झाली. एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा, विद्यार्थ्यांची झाडाझडती, भरारी पथकांची लगबग सुरू आहे. याचवेळी शहरातील एका परीक्षा केंद्राबाहेर दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन एका आईने दहावीची परीक्षा दिली.

बाळाच्या उज्वल भविष्यासाठी परीक्षा देणाऱ्या आईचे कौतुक होत आहे. या परीक्षेला विभागातून 629 परीक्षा केंद्रावर 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी 63 परीरक्षक केंद्र नेमण्यात आले आहेत. नांदेड पॅटर्न नुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी 11 वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यापूर्वी 10:30 वाजता विद्यार्थी आत तपासणी करून प्रवेश देण्यात आला.

भरारी पथकांची करडी नजर

परीक्षेत गैरप्रकार घडू नये म्हणून महसूल विभागाची 10 भरारी पथके व 33 बैठी पथके नेमण्यात आली आहेत. शिक्षण विभागाची 6 भरारी पथके प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात आहेत. तीन जणांचे बैठे पथक असुन ते परीक्षेच्या आधी एक तास ते परीक्षेनंंतर एक तास परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते. तसेच महिलांचे देखील एक स्वतंत्र पथक आहे.

मंडळाच्या सूचना

सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षा सूचीची नियमावली वाचून दाखवत आपल्या केंद्रावर कॉपी होणार नाही व कॉपी सापडणार नाही याची दक्षता घ्यावी. नियमांचे काटेकोर पालन करा. ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाचे शिक्षक आणि ज्यांचा परीक्षेशी काहीही संबंध नाही. असे लोक केंद्रावर असणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अशा सूचना शिक्षण मंडणांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. याशिवाय परिसारातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद राहतील. परीक्षा चालू असताना इतर वर्ग भरले जाणार नाहीत अशा सूचना मंडळाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

जिल्हानिहाय केंद्र व परिक्षार्थी

जिल्हाकेंद्रपरिक्षार्थी
छत्रपती संभाजीनगर22764 हजार 593
बीड15641 हजार 521
जालना9327 हजार 800
परभणी10030 हजार 676
हिंगोली5315 हजार 620
एकूण केंद्र6291 लाख 80 हजार 210
बातम्या आणखी आहेत...