आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून मिळणार दहावीचे हॉलतिकीट:लक्षात ठेवा प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का गरजेचा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना आजपासून दुपारी 3 वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेस 2 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी 20 फेब्रुवारी पासून प्रात्याक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या हॉलतिकीटाचे वितरण विद्यार्थ्यांना शाळा करत आहेत. आजपासून शाळांच्या लॉगइनमध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

प्रिंटवर असाव्यात या गोष्टी

अधिक माहितीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक www.mahahsscboard.in संकेतस्थळवर पाहू शकता असे आवाहन करण्यात आले आहे. हॉलतिकीटाची ऑनलाइन प्रिंट देतांना शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना आकारु नये. प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असावा. हॉलतिकीटामध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्यांच्या दुरुत्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.

हॉलतिकीट गहाळ झाल्यास?

फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ या संदर्भात काही दुरुस्त्या आल्यास त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर सोडवाव्यात. असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. याशिवाय हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावे.

फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारुन स्वाक्षरी द्यावी असेही राज्यमंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

परीक्षार्थींची आकडेवारी

  • औरंगाबाद - 64593
  • बीड - 41521
  • परभणी - 27800
  • जालना - 30676
  • हिंगोली - 15620
  • एकूण - 1 लाख 80 हजार 210
बातम्या आणखी आहेत...