आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी, बारावी परीक्षा:24 ऑगस्टपर्यंत 17 नंबरचा अर्ज ऑनलाईन भरता येणार, प्रक्रियेला सुरूवात

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेला बसण्याची सुविधा उपलब्‍ध करून देण्यात आली आहे. त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. त्‍यासाठीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. 24 ऑगस्‍टपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील.

ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया

शिक्षण मंडळातर्फे सविस्‍तर वेळापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्‍या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते आहे. शुक्रवार (दि.29) पासून 24 ऑगस्‍टपर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व निर्धारित शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी मुदत असेल. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबतची पावती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्‍या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 1 ते 26 ऑगस्‍ट अशी मुदत असणार आहे.

संपर्क केंद्र शाळा,महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी ३० ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल.

हि आहे लिंक

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीसाठी नाव नोंदणी ऑफलाईन अर्ज स्‍वीकारला जाणार नाही. http://form17.mh-ssc.ac.in किंवा http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्‍थळाच्‍या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्‍ध असेल. शाळांनी देखील इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवून त्यांना सहकार्य करण्याचे आहे. ज्यामुळे कुणीही या संधीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...