आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर
मंगळवार पासून पुन्हा एकदा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. याचा परिणाम आता दहावी-बारावीच्या परीक्षेच्या कामाकाजावर नसला तरी उत्तरपत्रिका तपासणीवर मात्र होणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने पुन्हा एकदा मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत बेमुत संप करण्यात येत असून, उत्तरपत्रिका तपाणीवर बहिष्कार टाकत असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता दहावी-बारावीच्या परीक्षा संपत आल्या असतांना उत्तरपत्रिकांच्या तपासणी पुन्हा प्रश्नांच्या जाळ्यात अडकली आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस २१ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. तर दहावीच्या परीक्षा २ मार्च पासून सुरु झाल्या आहेत. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात दहावी-बारावीच्या परीक्षा संपणार आहेत. तर उत्तरपत्रिका तपासणीचे वेळापत्रक जाहिर करत वेळेत निकाल जाहिर करण्यासाठी बोर्डाने तयारी केली आहे. मात्र परीक्षा झाल्यावरही उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पेपर सुरु झाल्यावर तिसऱ्या दिवसापासूनच उत्तरपत्रिकांचे दिलेल्या केंद्रावरुन संकलन होत त्या तपासणीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यंदा परीक्षा सुरु होवून दहा दिवस झाल्यावरही नियामक मंडळाची बैठक न झाल्याने आणि कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने गठ्ठे पडून होते. शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली होती. आता मात्र पुन्हा मंगळवार दि. १४ मार्च पासून पुन्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना जुक्टा, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांनी परीक्षेचे काम करु मात्र जुनी पेंशन हक्क योजना लागू होत नाही. तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी करणार नाही असे म्हटले आहे. यामुळे वेळेत परीक्षा होवून निकाल मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोट -
संप तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी नाही -
आधी मिळालेल्या आश्वासनामुळे आम्ही सहकार्य केले होते. विद्यार्थ्यांचे नुकसान आम्ही होवू देणार नाही. परंतु जोपर्यंत जुनी पेन्शन हक्क मिळत नाही. संप मिटत नाही. तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी केली जाणार नाही.
प्रा. गोविंद शिंदे - जुक्टा संघटना जिल्हा सचिव
कोट -
संघटनांची मागणी आम्ही यापूर्वी देखील शासनाला कळवली आहे. त्यांच्या सर्व मागण्या या शासनाकडे असल्याने त्याची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली आहे. असे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट -
- उत्तरपत्रिका संकलन केंद्रावर सादर करण्यासाठीचे वेळापत्रक
- इंग्रजी-१५ मार्च, हिंदी १७ मार्च, मराठी १८ मार्च, पाली, उर्दू १७ मार्च, संस्कृत, अरेबिक १८ मार्च, वाणिज्य संघटन, भौतिकशास्त्र २० मार्च
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.