आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो टेन्शन:परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल 11वीत प्रवेश

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • कनिष्ठ महाविद्यालयात क्षमतेपेक्षा अधिक जागा, गेल्या वर्षी 32% जागा रिक्त

कोरोनामुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे. परंतु ती व्यर्थ असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या तपासात स्पष्ट झाले आहे. मागेल त्याला महाविद्यालय या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात जागा असून सर्व उत्तीर्णांना प्रवेश दिल्यावरही बऱ्याच जागा शिल्लक राहतील. शालेय शिक्षण विभागानुसार, राज्याच्या ६ विभागांत २०२०-२१ मध्ये अकरावीच्या ५,५९,३४४ जागा होत्या. ४,४९,०५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. ३,७८,८६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर १,८०,४८३ म्हणजे ३२ %जागा रिक्त होत्या.

सर्वांना मिळेल प्रवेश : २०२०-२१ च्या दहावीच्या नियमित परीक्षेचा निकाल ९५.३० % लागला होता, तर अनुत्तीर्णांचे प्रमाण ४.७ % होते. पुरवणी परीक्षेत ७५.८६ % विद्यार्थी उत्तीर्ण तर २४.१४ % अनुत्तीर्ण झाले होते. या तुलनेेत अकरावीच्या ३२ % जागा रिक्त होत्या. दरवर्षी विद्यार्थी संख्येत फार बदल होत नाही. मागील वर्षाचा ट्रेंड लक्षात घेता यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीला हमखास प्रवेश मिळेल, असा विश्वास औरंगाबादचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) डॉ. बी. बी.चव्हाण यांनी व्यक्त केला.

प्रवेशाची अडचण येणार नाही
शासनाच्या मागेल त्याला शाळा या धोरणामुळे अकरावीचे वर्ग वाढले आहेत. यामुळे अकरावीला जागांचा प्रश्न येत नाही. यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी जागांची अडचण येणार नाही. प्रत्येकाला प्रवेश मिळेल. - डॉ. बी. बी.चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

औरंगाबादेत सर्वाधिक ४६.१५%, नागपुरात ४१.२१% जागा रिक्त
सीईटीच्या गुणांवर ठरणार महाविद्यालय : अकरावी प्रवेशासाठी यंदा जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १०० मार्कांची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाईल. ऑॅफलाइन असणारी परीक्षा ऐच्छिक असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. सीईटीतील मार्काच्या आधारावर आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. उरलेल्या जागावर सीईटी न देणाऱ्यांना प्रवेश मिळेल.

बातम्या आणखी आहेत...