आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचे नियोजन:शाळांच्या मागणीप्रमाणे एसटी करणार बसेसचे नियोजन : आगारप्रमुख

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच विविध भागातील शाळांच्या मागणीप्रमाणे एसटी बसेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख एस.एस. घाणे यांनी दिली. दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. शाळांच्या मागणी प्रमाणे त्या मार्गावर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून मागणी प्रमाणे बसेस सोडण्यात येणार आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी -विद्यार्थिनी गावाजवळील शाळेची निवड करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जसजसी मागणी येईल त्या मार्गावर बसेस सुरू करु, असे घाणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...