आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारच्या निर्णयाकडे लक्ष:न्यायालयावर पूर्ण विश्वास, आमचा दुखवटा सुरूच राहील; संपावर एसटी कर्मचारी ठाम

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलीनीकरणासाठी मागील तीन महिन्यांपासून संप सुरू आहे. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याप्रकरणी राज्य शासनाच्या समितीने मंगळवार, २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयात अहवाल सादर केला. शुक्रवार, २५ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होईल. आज निकाल लागेल या अपेक्षेने कर्मचारी बसस्थानकावर आले होते, परंतु तारीख वाढल्याने ते पुन्हा परत गेले. आमच्या बाजूने निकाला लागेल, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संप करत आहेत. तसेच त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातर्फे मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. अहवाल दाखल झाल्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला ठेवली आहे. दिवसभर न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आमचा संप म्हणजेच दुखवटा सुरूच ठेवणार आहोत, अशी त्यांनी भूमिका घेतली.

जाणीवपूर्वक दिरंगाई
शुक्रवारपर्यंत तारीख वाढली आहे. जोपयर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा दुखवटा सुरूच राहील. शासन जाणिवपूर्वक दिरंगाई करत आहे. अहवालावर अभिप्राय आणून दिला, परंतु त्यावर सही नव्हती. म्हणून तारीख वाढली. मकरंद कुलकर्णी, कर्मचारी

विलीनीकरण होणार
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण होणारच आहे, यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमचा न्याय व्यवस्थेवरही पूर्ण विश्वास आहे. शुक्रवारी नक्कीच आमच्यासाठी चांगला निर्णय येईल, अशी आम्हाला खात्री आहे. - सारिका डोंगरकर, वाहक

दुखवटा सुरू राहील
राज्य शासनात जोपर्यंत विलीनीकरण होत नाही. तसेच आमची बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडणारे आमचे वकील गुणरत्न सदावर्ते सांगत नाहीत तोपर्यंत आमचा संप सुरू राहील. आम्ही शुक्रवार २५ फेब्रुवारीची वाट पाहत आहोत.- मच्छिंद्र बनकर

बातम्या आणखी आहेत...