आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोविडच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या दांड्या, प्रशासकीय कामकाजावर सदस्यांचे ताशेरे

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

कोव्हिडच्या नावाखाली अनेक कर्मचारी दांड्या मारतात. कार्यालयीन वेळेत आपली जागा सोडून चहाच्या टपरीवर असतात. एकाच टेबलवर असणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा. कोणत्याही विभागात जा निविदा लवकर काढत नाहीत. पैशांशिवाय फाइल हालत नाहीत. जर असेच कामकाज चालवायचे असेल तर कोणत्या टेबलवर किती पैसे घेतात ही यादीच जाहिर करा म्हणते भ्रष्टचाराचे आरोपच होणार नाहीत. अशा कडक शब्दा शुक्रवारी जि.प. सदस्यांनी प्रशासकीय कामकाजावरच ताशेरे ओढले.

औरंगाबाद जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. जि.प. अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, सदस्य मधुकार वालतुरे, शिवाजी पाथ्रीकर, रमेश गायकवाड, किशोर पवार, केशवराव तायडे यांची उपस्थिती होती. या सभेत प्रशासकांमधील संथपणा आणि ग्रामीण भागातील लोकांना चक्रा माराव्या लागतात. कर्मचारी वर्ग वेळेत काम करत नाही ही जागेवर थांबत नाही.यावरुन चांगलाच आरोप-प्रत्यारोपांचा डाव सभेत रंगला. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे यांनी आरोप करत म्हणजे की, कामांचे नियोजन होत नसल्याने शासनाकडून आलेला निधी हा परत जातो. आता पाच सहा महिन्यांनी निवडणूका येतील. तेंव्हा प्रलंबित कामे त्वरीत करावीत. एकाच टेबलावर असलेले कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात अशी मागणीही सदस्यांनी केली. तर रमेश गायकवाड आणि मधुकर वालतुरे यांनी सांगितले शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरले. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत मुख्याध्यापक नियुक्तीचा वाद चांगला पेटला. शिक्षण विभागाचे सहकारी बँकेपर्यंत लागेबांधे आहेत.

गँग लॉबी शिक्षण विभागात सुरु असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तर शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक हस्तक्षेप करता येत नाही. असे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले. तर ग्रामीण भागात ओला दुष्काळा झाला आहे. अंगणवाड्या, शाळा मोडकळीस आल्या आहेत. यांची दुरुस्ती त्वरीत करा, गावातील रस्तेदुरुस्तीसाठी निधी आहे परंतु कामकाज निविदा वेळेत निघत नसल्याने होत नाही. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरु आहेत. येणाऱ्या अडचणी दुर कराव्यात विशेष लक्ष मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावे असेही सदस्य म्हणाले. दरम्यान मुदतबाह्य देयकास सभेने मंजूरी दिली.

सुमित महाजनचा सत्कार -

युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या सुमित महाजनचा जि.प. अध्यक्ष मीना शेळके आणि मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...