आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी:पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात; 15 सप्टेंबर शेवटची तारीख

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉलिटेक्निक प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया सोमवारी सायंकाळी संपली असून, आता मंगळवार दि.13 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेश फेरीत सहभागी होण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे.

माहिती तंत्रशिक्षण अधिकाऱ्यांची माहिती

दरम्यान झालेल्या दुसऱ्या फेरीतही मनाप्रमाणे निवडलेल्या महाविद्यालयाचा पर्याय न मिळाल्याने सहा हजार विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीत सहभागी होता यावे यासाठी बेटरमेंटचा पर्याय निवडला होता. अशी माहिती तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सोमवारी साडेआठ हजार जागा भरल्या

तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक ) प्रथम आणि द्वितीय वर्षासाठीप्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. यासाठी मराठवाडयात एकूण 10 शासकीय आणि खासगी 47 पॉलिटेक्निक आहेत. ज्यात एकूण 14 हजार 649 प्रवेश क्षमता आहे. यापैकी शासकीय महाविद्यालयातील शंभर टक्के जागा या भरल्या असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तर पहिली आणि दुसरी फेरी मिळून सोमवारी साडेआठ हजार जागा भरल्या आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

17 सप्टेंबरला होणार गुणवत्ता यादी जाहीर

दुसऱ्या फेरीसाठी 9 हजार 795 विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले होते. परंतु या फेरीतही सहा हजार विद्यार्थी असे होते की, ज्यांना हवी ती ब्राण्च आणि महाविद्यालय देवूनही न मिळाल्याने त्यांनी मिळालेल्या बेटरमेंट या ऑप्शनचा वापर करत तिसऱ्या फेरीसाठीचा पर्याय स्विकारला होता. दुसऱ्या फेरीसाठी सोमवार दि. 12 सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली असून, आता या विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार दि. 13 सप्टेंबर पासून तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. 17 सप्टेंबर रोजी तात्पूर्ती गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल.

या यादीतील विद्यार्थ्यांना 18 ते 21 सप्टेंबर दरम्यान प्रवेश निश्चितीचा स्वीकार करत प्रत्यक्ष महाविद्यालयात जावून, प्रवेश शुल्क भरुन 22 सप्टेंबर पर्यंत निश्चित करायचा आहे. यानंतर 2022-23 साठीची कटऑफ यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर होईल. तर संस्था स्तरावरील माहिती तंत्रशिक्षण संचालनालयास पाठवण्यासाठी संस्थांना 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत असणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...