आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. 'मराठवाडयातील खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेला आहे. त्यामुळे मराठवाडयातच राज्य क्रीडा विद्यापीठावर हक्क असून राज्य शासनाने औरंगाबादेत राज्य क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे असे डॉ.भागवत कराडांनी सांगतिले.
यापुर्वीच्या सरकारने औरंगाबादजवळ करोडीजवळ जागा उपलब्ध असतानाही आमचे हक्काचे विद्यापीठ पळविले. आता ते पुनःश्च औरंगाबादला झाले पाहिजे, तसेच ‘साई’ मध्ये विद्यापीठातील खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी म्हणाले.'
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागत कराड यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. या वेळी ते बोलत होते. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन, प्रख्यात खेळाडू धनराज पिल्ले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, राजभवन समितीचे अध्यक्ष डॉ.दिपक माने, सदस्य डॉ.दिनेश पाटील, मोहन अमरुळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे आदींची यांची उपस्थिती होती.
राज्य भवनच्यावतीने आयोजित या महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स या पाच प्रकारात स्पर्धा पाच दिवस रंगणार आहेत. यामध्ये राज्यातील २२ विद्यापीठाचे २ हजार १२० खेळाडू (१ हजार ११७ मुले),(१ हजार ३ मुली) तसेच ३०२ प्रशिक्षक (पुरुष २६८ व महिला ३४) सहभागी झाले आहेत. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत तसेच खेळाडूंचे पथसंचलन करण्यात आले. कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी प्रास्ताविकात आयोजनामागची भुमिका मांडली. डॉ.पुरुषोत्तम देशमुख, अमृत बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन तर संचालक डॉ.दयानंद कांबळे यांनी आभार मानले.
सर्वच प्रकारच्या खेळांना केंद्र व राज्यस्तरावरुन मोठे आर्थिक सहकार्य, पाठबळ मिळत आहे. तसेच खेळाडूंना मिळणारे मानधन, पारितोषिके याची रक्कम वाढविली आहे. पुर्वीच्या तुलनेत खेळाडूंना आता चांगले दिवस आले आहेत, असे राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन म्हणाले.
कोणत्याही खेळात विजेतेपद पटकावयाचे असेल तर खेळाडूकडे ’पॅशन, डेडीकेशन व हार्डवर्क’ या त्रिसुत्रीची आवश्यकता आहे, असे प्रख्यात हॉकीपट्टू धनराज पिल्ले यांनी केले.
तब्बल ११ कोटी ७५ लाख रुपये खर्चुन तयार होणाऱ्या अत्याधुनिक अशा माठवाडयातील पहिल्या सिंथेटिक ट्रॅकचे भुमीपुजन डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. १० लेनच्या ४०० मी लांबीच्या सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ’खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत सात कोटींचा निधी डॉ.कराड यांच्या सहकार्याने प्राप्त होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.