आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीपिंग:रात्रपाळीत बाजारपेठेमध्ये स्वीपिंग सुरू करा : डॉ. चौधरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बाजारपेठ आणि व्यावसायिक भागांमध्ये रात्रीच्या पाळीत सोमवारपासून स्वीपिंग सुरू करण्याचे आदेश मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. डॉ. चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता कांचनवाडी येथील मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ सेंटर)ची पाहणी केली.

या वेळी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख सोमनाथ जाधव, सीआरटीचे गौरी मिराशी, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात आदींची उपस्थिती होती. एमआरएफ सेंटरचा सखोल आढावा घेतला. एमआरएफ सेंटर सेमी ऑटोमॅटिक करण्यासाठी आणि येथील एमआरएफची क्षमता २० टन होईल. तसेच, एमआरएफ परिसरात काँक्रिटीकरण करणे व परिसर हिरवागार आणि स्वच्छ करण्यासाठी आराखडा तयार करून सादर करावा, असे आदेश दिले. या वेळी उपस्थित कचरा वेचकांची भेट घेतली.

त्यांच्याशीही संवाद साधला. कचरा वेचक महिलांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व त्यांना जेवणासाठी स्वच्छ जागेची व्यवस्था करून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी कांचनवाडी येथील बायो मिथेनायझेशन प्लँटची पाहणी केली व सदरील प्लँटच्या सद्य:स्थितीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...