आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच उपाय सध्या असल्याने लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. आतापर्यंत 12 ते 18 वयोगटातील 57 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, शाळा बंद असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात अडथळे होते. ते आता दूर झाले असून, उद्या 13 जून पासून शाळा सुरु होत असल्याने पुन्हा शाळांमध्ये लसीकरण मोहिम सुरु करण्यात येईल अशी माहिती जि.प. आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या दोन अडीच वर्ष शाळा बंद होत्या. तर कोरोनावर प्रतिबंधात्मक लस आल्याने आणि प्रादुर्भाव कमी झाल्याने शैक्षणिक सत्रास सुरुवात करण्यात आली. परंतू 2021-22 हे शैक्षणिक वर्ष जरा विस्कळीत होते. परंतु आता उद्या सोमवार दि. 13 जून पासून नवे 2022-23 हे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे उन्हाळी सट्यांमुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या वेगावरही परिणाम झाला होता. आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला वेग देण्यात येणार असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हयात 12 ते 14 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 16 मार्च पासून सुरुवात करण्यात आली होती. मात्र शाळांना नंतर उन्हाळी सुट्या लागल्याने आणि लस हव्या त्या प्रमाणात उपलब्ध न झाल्याने लसीकरण थांबले होते. शिक्षण विभागास लसीकरण करुन घेण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते. परंतु सुट्यांमुळे शिक्षण विभागाकडूनही हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र शाळा सुरु झाल्याने लसीकरणाला वेग येईल आणि शंभर टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्यात येईल असे डॉ. शेळके यांनी सांगितले.
12 ते 14 वयोगटातील ग्रामीण भागातील 92983 तर शहरातील 45255 असे एकूण 1 लाख 38 हजार 238 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. तर आतापर्यंत 78 हजार 963 विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तसेच यापैकी 25 हजार 598 जणांचा दुसरा डोस झालेला आहे. पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अवघे 57 टक्के झालेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.