आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रुग्णालय:आजपासून दोन खासगी रुग्णालयातही घेता येईल बूस्टर डोस, 18 वर्षांवरील सर्व पात्र ; 63 टक्क्यांनी घेतला दुसरा डोस

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा बूस्टर डोस अर्थात प्रीकॉशन लसीकरणाला शनिवारपासून (१८ जून) खासगी रुग्णालयातही सुरुवात होत आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकाला ही लस घेता येणार आहे. तर, मनपा व शासकीय रुग्णालयात बूस्टर डोससाठी ६० वर्षांचे बंधन आहे. सर्वत्र मुबलक लसी उपलब्ध आहेत. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. कोविशील्डचा बूस्टर डोस शनिवारपासून दुपारी ३ ते ५ या वेळेत धूत रुग्णालयात दिला जाईल. मेडिकेाव्हर रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देण्यात येत आहे. डॉ. मंडलेचा म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी डॉ. हेडगेवार, डॉ. कमलनयन बजाज, युनायटेड सिग्मा आणि एमजीएम रुग्णालयाला पत्र देऊन लसीकरण सुरू करण्यास सांगितले आहे. धूतमध्ये ३८० रुपयांत लस मिळेल, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितले.

शहर, ग्रामीणमध्ये लस घेणाऱ्यांची संख्या भाग उद्दिष्ट पहिला डोस दुसरा डोस % ग्रामीण २४०५८३१ २०२०२३० १५३६९५२ ८३ शहरी ११७०९०७ ९७७१९५ ७५०४०१ ६४ बूस्टर - ८१२०० - -

दिवसभरात १० नव्या रुग्णांची नोंद शुक्रवारी १० नव्या (शहर ९, ग्रामीण १) कोरोना रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ३२ घरीच उपचार घेत आहेत.

शहरात कुठेच तुटवडा नाही शासनाच्या सर्वच सेंटर्सवर लस उपलब्ध आहे. कुठेही लसीचा तुटवडा नाही. सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. लसीकरणामुळे नागरिकांना सुरक्षा मिळेल. कोविड झाल्यानंतर उपचार, धावपळ करण्यापेक्षा लस घेणे अधिक हितकारक आहे. त्यामुळे लस घ्यावी, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...