आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे मॅजिक चालले:रेल्वे स्टार्टअप इनोव्हेशन धोरणात मागण्यांची पूर्तता; तरुणाईला मिळणार मोठ्या संधी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे डिटेक्शन सिस्टीम अद्ययावत करणे, रेल्वे तणाव नियंत्रण करणारी यंत्रणा विकसित करणे, अचूक ट्रॅक इन्स्पेक्शन करणारी यंत्रणा विकसित करणे, प्रवाशांसाठी सेवा सक्षम करण्यासाठी डिजिटल टूल विकसित करणे अशा विविध ११ आव्हानांना न्याय देणाऱ्या विविध स्टार्टअपसाठी भारतीय रेल्वे स्टार्टअप उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता औरंगाबादेतील मराठवाडा एक्सलरेटर फॉर ग्रोथ अ‌ॅण्ड इंक्युबेशन काऊंसिल (मॅजिक) ने गेली दोन वर्षे पाठपुरावा केल्याने यश आले आहे. देशातील उदयोन्मुख प्रयोगशील तरुणाईला यातून मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी दिली.

नेमका उपक्रम काय?

भारतीय रेल्वेने स्टार्ट-अप आणि इतर संस्थांच्या सहभागाद्वारे नवोन्मेषाच्या क्षेत्रात हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे "रेल्वेसाठी स्टार्टअप्स" या धोरणाचा प्रारंभ केला आहे. या उपक्रमाबद्दल माहिती वैष्णव म्हणाले की, या मंचाद्वारे स्टार्ट अप्सना रेल्वेशी जोडण्याची उत्तम संधी प्राप्त होईल. रेल्वेचे विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालये/क्षेत्र यामधून प्राप्त झालेल्या १०० हून अधिक समस्या निवेदनांपैकी, या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी, रेल्वे फ्रॅक्स्चर, हेड-वे रिडक्शन यांसारखी ११ समस्या निवेदने या उपक्रमाअंतर्गत हाती घेण्यात आली आहेत.

काय होणार फायदा?

उपक्रमाबद्दल आशिष गर्दे म्हणाले, भारतीय रेल्वेमध्ये नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि रेल्वेशी अधिकाधिक स्टार्टअप्सना जोडण्याच्या हा प्रयत्न आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे स्टार्टअपकरिता असा उपक्रम स्थापन करण्यात यावा, याकरिता तत्कालीन रेल्वेमंत्री, उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ५ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत मॅजिक’तर्फे मागणी करण्यात आली होती. औरंगाबाद - जालना सारख्या टियर-२-३ शहरांमधून रेल्वेसाठी नवीन वेंडर विकसित करण्याकरिता विशेष प्रयत्न केले पाहिजे, असेही यावेळी लक्षात आणून दिले होते. महाराष्ट्रातील लातूर येथे रेल्वे कोच बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे. अशा रेल्वे आस्थापनाच्या माध्यमातून स्थानिक स्टार्टअप्स आणि लघुउद्योजकांना रेल्वेसोबत व्यवसाय संधी उपलब्ध होण्यास या नवीन धोरणामुळे पाठबळ मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मॅजिकच्या प्रलंबित मागण्या

१. रेल्वे माध्यमातून स्थानिक स्टार्टअप वेंडर/ व्यवसाय संधी उपलब्ध करून द्यावी . मागदर्शन व्हावे.

२. ऑरिक हे स्टार्टअप्ससाठी प्राधान्य असलेले शहर म्हणून विकसित करण्यात आणि त्याचे योग्य मार्केटिंग करण्यात यावे.

३. गुजरात येथील रेल्वे विद्यापीठाच्या धर्तीवर औरंगाबाद (ऑरिक) येथे स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना पाठबळ देणारे ‘रेल्वे बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर’ विकसित केले पाहिजे.

४ ऑरिकमध्ये या स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांसाठी स्वतंत्र झोन विकसित केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...