आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप:जिल्ह्यात 70 ठिकाणी स्टार्टअप यात्रा, 22 नवसंकल्पनांची नोंदणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आपल्या आजूबाजूला असलेल्या अडचणी दूर करण्याच्या माध्यमातूनच नव्या कल्पना जन्माला येतात. यातून नवे स्टार्टअप सुरू होतात असे दिसून आले आहे. यासाठी महाराष्ट्र यात्रा हे सरकारने पुढे टाकलेले पाऊल आहे. तुमची लहानशी कल्पनाही असेल तर यामध्ये आवर्जून नोंदवा. कारण पारितोषिक मिळणे हे दुय्यम आहे. या व्यासपीठावर आलात तर संधीचा मार्ग खुला होईल. म्हणून आवर्जून प्रतिसाद द्या,’ असे आवाहन चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे (सीएमआयए) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी केले.

१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेने जिल्ह्यात आतापर्यंत ७० ठिकाणी भेटी दिल्या असून त्यात २२ स्टार्टअपची नोंद झाली आहे. राज्यभरात ही यात्रा सुरू आहे. प्रत्येक तालुका, जिल्ह्यात जाऊन नव्या कल्पनांना यात्रेत सहभागी केले जात आहे. विविध उद्योग संघटना, महाविद्यालय आणि विद्यापीठात ही यात्रा फिरत आहे. स्टार्टअप महाराष्ट्र यात्रेने शुक्रवारी मॅजिकला भेट दिली. या वेळी मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, सीएमआयचे सचिव अर्पित सावे उपस्थित होते. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाद्वारे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ३० ते ३५ स्टार्टअप आलेले होते.

तीन स्तरावर काम करणार स्टार्टअप यात्रा, एक लाखाचे अनुदानही मिळणार - तालुकास्तरीय प्रचार व प्रबोधन : यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येत आहे. - जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा : प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतची माहिती, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमची व्याख्याने आयोजित केली आहेत. नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांच्या सादरीकरणासाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना २५,००० रुपयांपर्यंतचे पारितोषिक दिले जाणार आहे. - राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा : प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरवण्यात येणार आहे, अशी यात्रेची माहिती समन्वयक अमोल मोकळे यांनी दिली.

* स्टार्टअप नोंदणी आणि अधिक माहितीसाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...