आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस:सनहॅक्स हॅकेथाॅनद्वारे स्टार्टअपला प्राेत्साहन, स्पर्धेत 1 लाखाचे बक्षीस

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना व्यासपीठ मिळावे तसेच नवीन स्टार्टअपला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नाशिकमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सनहॅक्स २०२२ या हॅकेथाॅनचे आयोजन केले आहे. १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत अभियांत्रिकीचे एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. विजेत्यांना एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या अंतर्गत संदीप युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग आणि इएसडीएस साॅफ्टवेअर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची ही स्पर्धा घेतली जात आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांची माहिती नोंदणी करताना द्यावी लागेल. अधिक माहिती www.sandipuniversity.edu.in/sunhack22 यावर नोंदणी करता येईल.

या स्पर्धेत ३६ तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना आपला प्रकल्प सादर करावा लागेल. स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी हाेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...