आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:स्मार्ट वाहतुकीसाठी स्टार्टअपने उपाय सुचवावेत; 20 लाखांपर्यंत बक्षीस

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येऊ शकते, यासाठी स्टार्टअप्सकडून उपाय मागवण्यात येत आहे. उत्कृष्ट उपाय सुचवणाऱ्या स्टार्टअप्सना केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाकडून २० लाखापर्यंत बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेत ३० नोव्हेंबरपर्यंत सहभागी होता येईल.

ट्रान्सपोर्ट फॉर ऑल स्पर्धेत देशातील ४५ शहरांची निवड झाली. या स्पर्धेअंतर्गत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर, परवडणारी आणि कार्यक्षम कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी विविध तंत्रज्ञानयुक्त उपाय करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल हे उद्दिष्ट आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादसुद्धा स्पर्धेत भाग घेत आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कसे सुधारता येईल, यासाठी स्टार्टअप्सला स्मार्ट सिटीकडून आवाहन करण्यात येत आहे.

या वेबसाइटवर पाठवा कल्पना
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीच्या उपाययोजना ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत smartnet.niua.org/transport4all वर पाठवाव्यात. शहर बससेवा व अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्त लोकांनी लाभ घ्यावा यासाठी डिमांड आणि गरजा लक्षात घेऊन मार्गाचे नियोजन करणे, सिटी बस सेवा व त्यातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक ठरवण्यासाठी उपाय, बस सेवेचा नियंत्रण आणि निरीक्षण करण्यासाठी उपाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी व नियोजन करण्यासाठी मोबाइल ॲप, प्रवाशांची तक्रार नोंदवण्यासाठी सिस्टिम व ऑटोरिक्षा व कॅब यांची नियंत्रण आणि निरीक्षण करणारी यंत्रणा आदींबाबत उपाय सुचवावे, असेही आवाहन मनपाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...