आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरडशहापूर येथील प्रकार:चोरट्यांनी पळविले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम; 43 लाख रुपये घेऊन चोरटे फरार, एटीएम फेकले 5 किलोमीटरवर एटीएम

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न

औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर शिरडशहापूर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी ता. 6 पहाटे साडेचार वाजता घडली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. घटनास्थळापासून पाच किलो मिटर अंतरावर फोडलेले एटीएम पोलिसांना सापडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरडशहापूर येथे बसस्थानका जवळ भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये सुमोर 43 लाख रुपये होते. शिरडशहापूर येथे परिसरातील सुमारे 30 ते 40 गावांचा संपर्क येतो. या शिवाय औरंगाबाद कडून आंध्रप्रदेशात जाणारी वाहने देखील याच मार्गाने धावतात.

एटीएमचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी एटीएम उभारण्यात आले आहे. दरम्यान, आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे एटीएम मशीनच उचलून नेली. यावेळी चोरट्यांनी दोरी व इतर साहित्याचा वापर केला. विशेष म्हणजे एटीएम नेतांना काही व्यक्तींना पहिल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने भेट दिली.

पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी नाकाबंदीचे आदेश दिले. तसेच परिसरात तपासणी सुरु करण्यात आली. यामध्ये घटनास्थळापासून पाच किलो मिटर अंतरावर कुरुंदा ते गिरगाव मार्गावर फोडून फेकून दिलेले एटीएम आढळून आले. मात्र त्यातील रक्कम गायब झाली आहे. मात्र त्यात किती रक्कम होती याची माहिती मिळू शकली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न
या एटीएम मशीनच्या काचा फोडून चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले. त्यामुळे आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...