आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा:लातूरमध्ये उद्यापासून रंगणार स्पर्धा; औरंगाबादच्या संघाचा 'ड' गटात समावेश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने लातूर जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे 33 व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत लातूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दोन्ही गटात एकूण 25 जिल्हा संघटनेचे संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी 6 मातीचे मैदान तयार करण्यात आले असून सायंकाळी विद्युत झोतात सामने खेळवण्यात येणार आहेत. गतवर्षी पाथरी येथील स्पर्धेत किशोर गटात परभणी प्रथम, तर नंदुरबारने द्वितीय क्रमांक पटकावला होता. या संघांना पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनावृत्ती करावी लागले. या स्पर्धेतून डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी दिली.

औरंगाबादसमोर बलाढ्य संघांचे आव्हान

या स्पर्धेसाठी बुधवारी गटवारी झाली असून औरंगाबादच्या मुलामुलींच्या दोन्ही संघाचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. किशोरी गटात औरंगाबादसमोर बलाढ्य सांगली व मुंबई शहर संघाचे आव्हान असेल. तसेच यजमान लातूर संघाला घरच्या मैदानाचा फायदा होईल. किशोरी गटातदेखील औरंगाबादसमोर कोल्हापूर व नाशिक संघ तगडे आव्हान उभे करेल. यजमान लातूर संघाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल. लातूरही गटातून मुसंडी मारू शकतो.

गटवारी पुढीलप्रमाणे

किशोर - अ गट परभणी, पालघर, अहमदनगर, सिंधुदुर्ग. ब गट - नंदुरबार, जालना, मुंबई उपनगर, धुळे. क गट - कोल्हापूर, सातारा, ठाणे, सोलापूर. ड गट - सांगली, मुंबई शहर, औरंगाबाद, लातूर. इ गट - पुणे, रायगड, रत्नागिरी, बीड. फ गट - हिंगोली, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड. किशोरी : अ गट - सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड. ब गट - पुणे, मुंबई शहर, रत्नागिरी, जालना. क गट - मुंबई उपनगर, ठाणे, उस्मानाबाद, जळगाव. ड गट - कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर. इ गट - अहमदनगर, सोलापूर, सातारा, हिंगोली. फ गट - परभणी, पालघर, धुळे, बीड, नंदुरबार.

बातम्या आणखी आहेत...