आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा:कुमार गटात ठाणे विरुद्ध पुणे, तर मुलींमध्ये उस्मानाबाद विरुद्ध नाशिक विजेतेपदासाठी भिडणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा खो-खो संघटनेतर्फे आयोजित 48 व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाणे विरुद्ध पुणे तर मुलींमध्ये उस्मानाबाद विरुद्ध नाशिक असे अंतिम सामने रंगणार आहेत. धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सामने सुरु आहेत.

मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने ठाण्यावर 10-9 अशी 8.20 मि. राखून एक गुणाने दणदणीत मात केली. उस्मानाबादच्या अश्विनी शिंदे (4, 3.30 मि. संरक्षण व 4 गुण), सुहानी धोत्रे (1.20 मि. संरक्षण व 3 गुण) तन्वी भोसले (1.50, 3.30 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. ठाणेच्या दिव्या गायकवाड (1.30 मि. संरक्षण व 1 गुण), पायल भांगे (1.20 मि. व 2 गुण) यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.

सांगलीची निकराची लढत

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाशिकने सांगलीवर चुरशीच्या सामन्यात 13-12 (मध्यंतर 7-6) असा एक गुणाने निसटता विजय मिळवला. नाशिकतर्फे सोनाली पवार (2.40, 1 मि. संरक्षण व 1 गुण), निशा विजल (1.40, 1.30 मि. संरक्षण), दीदी ठाकरे (1.30, 1.50 मि. संरक्षण व 3 गुण), वृषाली भोमे (6 गुण) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. सांगलीतर्फे प्रगती कर्नाळे (2.40, 1 मि. संरक्षण), सानिया निकम (2 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी निकराची झुंज दिली.

पुण्याने उडवला नगरचा धुव्वा

कुमारांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने अहमदनगरचा 14-10 असा एक डाव 4 गुणांनी धुव्वा उडवला. पुण्याकडून विनायक शिंगाडे (2.30, 3.10 मि. संरक्षण व 1 गुण ), विवेक ब्राह्मणे (2 मि. संरक्षण व 2 गुण), आकाश गायकवाड (1.20, 1.30 मि. संरक्षण व 2 गुण), देवांग गादेकर (2, 2 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत नगरच्या खेळाडूंना गुणांची संधी दिली नाही. नगरकडून अथर्व निकम (1 मि. संरक्षण व 2 गुण), शिवम नामदले (1.20 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत ठाण्याने उस्मानाबादचा 19-15 (मध्यंतर 11-9) असा 4 गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. ठाण्याचा मयुरेश मोरे (2, 1.30 मि. संरक्षण ), सुरज झोरे (1.20, 1.50 मि. संरक्षण व 5 गुण), रुपेश कोंढाळकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. उस्मानाबाद तर्फे किरण वसावे (2.10, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण), श्रीशंभो पेठे (1, 1.10 मि. संरक्षण व 1 गुण), रवी वसावे (4 गुण) यांनी चांगली लढत दिली.

बातम्या आणखी आहेत...