आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रेपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र व औरंगाबाद संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय बालगट ग्रेपलिंग स्पर्धेत जालना संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान औरंगाबादचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला. स्पर्धेत साईनाथ कुबेर, आराध्या कुबेर, महेश रणपिसे, स्वराज राठोड, मुग्धा पाटील आदींनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विभागीय क्रीडा संकुलावर झालेल्या स्पर्धेत 12 जिल्ह्यातील 200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
विजेत्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. उदय डोंगरे यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी ग्रेपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राकेश खैरनार, उपाध्यक्ष विकास गोसावी, प्रवीण शिंदे, सहसचिव प्रा.सागर मगरे, सचिन आत्रे, कोषाध्यक्ष प्रतीक्षा नवगिरे, डॉ.भालचंद्र मोरे, संतोष आवचार, सुशील अंभोरे, अमिन शहा यांची उपस्थिती होती.
विजेत्यांची राज्य संघात निवड
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. देहरादून (उत्तराखंड) येथे 19 ते 21 ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ प्रतिनिधीत्व करेल. राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी कन्हैयालाल माळी (धुळे) यांची, तर संघ व्यवस्थापक म्हणून भगवान भुवर आणि महिला प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून किरण पाटील (जालना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंतिम निकाल
15 वर्ष गट : 47 किलो - साईनाथ कुबेर (औरंगाबाद), आदित्य दराडे (जालना), रोहित डवणे, राम गोयल, केशव कुमार, प्रीतम कढरे (धुळे). 11 वर्ष मुले - महेश रणपिसे (औरंगाबाद), प्रतीक माळी, पृथ्वीराज मोरे, राजपीर जाळे (जालना). मुली - आराध्या कुबेर, अनुराधा शेळके, अभिलाषा गळवाटे, शिसा टाक, अश्विनी राऊत, भुवनेश्वरी पाटील, राजेश सोनवणे. 13 वर्ष गट - स्वराज राठोड, श्याम रिगोल, अभिजीत गायकवाड, साई वडगुजर, शौर्य वाडेकर, प्रामाणिक पाटील, हार्दिक पाटील, निशांत जयरंग, रुपेश डाले, झलक भट, मुग्धा पाटील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.