आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य जिम्नॅस्टिक संघटनेची निवडणूक:संजय शेटे बनले नवे अध्यक्ष, वीरेंद्र भांडारकर मोठा धक्का, अवघ्या 2 मतांनी पराभव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेची उपायुक्त धर्मदाय मुंबई यांच्या मार्फत निवडणूक घेण्यात आली. 2011 पासून सुरू असलेल्या वादनंतर ही निवडणूक मुंबईमध्ये शनिवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत 21 जणांची जंम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मुंबई शहरचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी मुंबई उपनगरचे वीरेंद्र भांडारकर यांचा चुरशीच्या लढतीत अवघ्या 2 मतांनी पराभव केला आणि हि निवडणूक (24 विरुद्ध 22) मतांनी भांडारकरांचा पराभव केला. हा त्यांना मोठा धक्का ठरला आहे.

शासकीय सेवेतून बाहेर पडल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व असलेल्या वीरेंद्र भांडारकर यांनी प्रथमच एखाद्या संघटनेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला.

त्याचबरोबर, आंतरराष्ट्रीय पंच व खेळाडू व महाराष्ट्रातील सर्वोच्च असा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जालन्याच्या डॉ. मकरंद जोशी यांनी सचिवपदाची निवडणूक 4 मतांनी जिंकली. डॉ. जोशी यांनी नाशिकच्या राकेश केदारे यांचा 25-21 मतांनी पराभव केला. डॉ. मकरंद जोशी हे मुळचे औरंगाबादचे आहे. मात्र, ते जालना जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. शेटे व जोशी यांनी पुन्हा एकदा संघटनेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

राज्य जिम्नॅस्टिक संघटनेची नुतन कार्यकारिणी :

अध्यक्ष : संजय शेटे (मुंबई शहर)

सचिव : डॉ. मकरंद जोशी (जालना)

कार्याध्यक्ष : के.जी.जाधव (कोल्हापूर)

कोषाध्यक्ष : आशिष सावंत (वैयक्तिक सभासद)

उपाध्यक्ष : सुनील चौधरी (धुळे), संदीप जोशी (पुणे), मंगेश इंगळे (वैयक्तिक सभासद), माधुरी चेंडके (अमरावती), डॉ.आदित्य जोशी (औरंगाबाद), बाळू ढवळे (ठाणे).

सहसचिव : दिपक बराड (नागपूर), सविता मराठे (पुणे), संजय तोरस्कर (कोल्हापूर), विजय पहुरकर (बुलढाणा), मंदार म्हात्रे (मुंबई उपनगर).

सभासद : संतोष जोशी (धुळे), गणेश ठाकरे (जालना), सुरेश भगत (वैयक्तिक सभासद), मुकेश कदम (रत्नागिरी), अजय मापुस्कर (वैयक्तिक सभासद), संतोष पिंगळे (बुलढाणा).

बातम्या आणखी आहेत...