आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धा:औरंगाबादच्या खेळाडूंनी जिंकली 10 सुवर्णांसह 28 पदके

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामपूर (सांगली) येथे झालेल्या 28 वी राज्यस्तरीय अ‍ॅक्रोबटीक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा उत्साहत संपन्न झाली. या स्पर्धेत औरंगाबादच्या युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व राखले. औरंगाबादच्या संघाने स्पर्धेत एकूण 28 पदके आपल्या नावे केली. यात 10 सुवर्ण, 13 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. कनिष्ठ गटात औरंगाबादचा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात एकूण 600 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. औरंगाबादच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या वैयक्तीक व सांघिक अशा दोन्ही प्रकारात खेळाडूंनी पदके आपल्या नावे केली. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

संघ प्रशिक्षक म्हणून अश्वजीत शेजूळ यांनी काम पाहिले. यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी, साईचे उपसंचालक नितीन जैस्वाल, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. संकर्षण जोशी, तनुजा गाढवे आदींनी अभिनंदन केले.

अपेक्षेप्रमाणे कामगिरी

औरंगाबादच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. संघाची आणखी सुवर्णपदके वाढली असती, मात्र थोडक्यात खेळाडूंचा पराभव झाला. त्याच्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यांच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. मकरंद जोशी यांनी व्यक्त केली.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे

वरिष्ठ गट मिश्र दुहेरी - निधी धर्माधिकारी व शुभम सरकटे (सुवर्ण). पुरूष - निखिल पाटील व ऋत्विक देव (3 रौप्य). कनिष्ठ मिश्र दुहेरी गट - रिद्धी जयस्वाल व हर्षल आठवले (3 सुवर्ण). पुरूष - साहिल माळी व पार्थ रामसेतवाल (1 सुवर्ण, 2 रौप्य). महिला दुहेरी - गीता कुमतेकर व अकांशा लाखोकर (2 कांस्य). महिला संघ - स्वराली पेहेरकर, सलोनी म्हस्के, प्राजंल पारील (1 रौप्य, 1 कांस्य).

बातम्या आणखी आहेत...