आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव:क्रीडा मशालने केला प्रथमच 600 किलोमीटरचा प्रवास; रॅलीत 250 जणांचा सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवदरम्यान यंदा प्रथमच क्रीडा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होेते. तब्बल 600 किमीचा प्रवास करुन ही क्रीडा ज्योत शनिवारी औरंगाबादेत आली होती. शनिवारी क्रांती चौक ते विद्यापीठ असा मार्गक्रम करत क्रीडा ज्योत दुपारी मैदानात पोहोचली. या रॅलीत 250 जणांनी सहभाग घेतला होता.

ही ज्योत आगामी पाच दिवस म्हणजे 8 डिसेंबरपर्यत खेळाडू, रसिकांच्या मनात ऊर्जेच्या स्त्रोत तेवत ठेवली जाणार आहे. कुलगुरुंच्या संकल्पनेतून यंदा विद्यापीठ अंतर्गत औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व जालना अशा चार जिल्ह्यातून ही मशाल रॅली काढण्यात आली होती.

जिल्ह्यात ठिकठिकाणी मशालीचे स्वागत

रॅलीचे समन्वयक डॉ. संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चंद्रजीत जाधव व प्रा. पांडुरंग रणमाळ यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील भवानी मातेच्या मंदिरात ही क्रीडा ज्योत पेटवण्यात आली. त्यानंतर चार जिल्ह्यात या मशाल रॅलीद्वारे राज्य क्रीडा स्पर्धेची जनजागृती करण्यात आली. विविध जिल्ह्यात ठिकठिकाणी मशालीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवरायांना अभिवादन करुन रॅलीला सुरुवात

शनिवारी क्रांती चौकत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी रॅली व सहभागी खेळाडूंचे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करुन रॅली विद्यापीठाकडे मार्गस्थ झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासह महापुरुषाच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. रॅली विद्यापीठाकडे मार्गस्थ झाली.

मोठ्या संख्येने खेळाडू-विद्यार्थ्यी सहभागी

रॅलीमध्ये जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतराष्ट्रीय खेळाडू तुषार आहेर, प्रा. सागर मगरे, स्वप्नील तांगडे हे ज्योत घेवून धावले. त्याचबरोबर रॅलीत कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, प्रभारी क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.संजय सांभाळकर, डॉ.आनंद देशमुख, एस.जी.शिंदे यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...