आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कबड्डी स्पर्धा:मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, अहमदनगर, नाशिकचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, सांगली, रायगड, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी या संघांनी 49 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलामुलींच्या दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. गतविजेता पालघरचा कुमारी संघ यंदा साखळीतच गारद झाला. त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. नाशिक बरोबरचा पराभव त्यांना महागात पडला.

मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानने आयोजित केलेले हे सामने गंगाखेड-परभणी येथील स्व. माणिकराव गुट्टे क्रीडानगरीत सुरू आहेत. सामने अत्यंत चुरशीने खेळले जात असल्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी संघात चुरस निर्माण झाली. अ गटात सोलापूरने नाशिकला 37-28 असे पराभूत केल्यामुळे सोलापूर, नाशिक, पालघर यांचे समान 4-4 साखळी गुण झाले. संघांच्या गुणांतील फरक काढण्यात आला. सोलापूर +3, नाशिक 0, पालघर -3 असा फरक निघाला. त्यामुळे सोलापूर व नाशिक यांनी बाद फेरी गाठली. कुमारी ड गटात देखील मुंबई शहर व अहमदनगरचे 5-5 समान साखळी गुण झाले. यात गुणांच्या फारकत मुंबई शहरने बाजी मारत गटात प्रथम क्रमांक मिळविला. नगरने दुसरा क्रमांक मिळवीत बाद फेरी गाठली.

जळगाव, परभणीचे 3-3 समान गुण :

कुमारांच्या अ गटात कोल्हापुरने सर्व साखळी सामने जिंकत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर दुसऱ्या क्रमांकाकरिता मुंबई शहर, बीड या दोन संघात 3-3 समान साखळी गुण झाले. त्यात मुंबईने -23 गुण घेत बाजी मारली. कुमारांच्या ड गटात पुण्याने सर्व सामने जिंकत बाद फेरी गाठली. पण जळगांव, परभणीचे 3-3 समान साखळी गुण झाले. त्यात जळगांवने -12 गुण मिळवीत बाजी मारली. कुमारांच्या फ गटात देखील सांगली व रत्नागिरीचे 7-7 समान साखळी गुण झाले. सांगलीने +97 गुण वसूल करीत प्रथम, तर रत्नागिरीने +60 गुण मिळवीत द्वितीय क्रमांक मिळवीत बाद फेरी गाठली. पालघर, कोल्हापूर, जळगांव यांनी देखील मुलांच्या, तर यजमान परभणीसह नांदेड, सोलापूर यांनी कुमारी गटात बाद फेरी गाठली. आज सायंकाळच्या सत्रात उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...