आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कबड्डी स्पर्धा:किशोर गटात परभणी, अहमदनगर, मुलींमध्ये सांगली, परभणी, नाशिक संघ उपांत्य फेरीत दाखल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदपूर (लातुर) येथील महात्मा गांधी महाविद्यलयाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्य किशोर व किशोरी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात किशोर गटात परभणी, अहमदनगर, तर किशोरी गटात मुंबई उपनगर, सांगली, परभणी संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

किशोर गटात अत्यंत चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यात परभणीने पुणे संघावर 32-31 अशी अवघ्या एक गुणांनी मात करत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला परभणी संघ 16-17 अशा एक गुणांनी पिछाडीवर होता. मध्यतरानंतर परभणीच्या विजय तरेने अत्यंत संयमी खेळ करत बोनस मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला अमित कांबळेने चांगल्या पकडी घेत साथ दिली. पुण्याच्या चढाईपटू रोहित चव्हाणला शेवटच्या चढाईत गुण मिळवता आले नाही. पुण्याच्या संघाचा 2 लोन लावूनही पराभव झाला. पुण्याच्या श्रीधर कदमने उत्कृष्ट चढाया करत परभणीचा बचाव भेदला होता. ऋषभ वाळूंजने ही त्याला चांगली साथ दिली. मात्र परभणीच्या सांघिक संयमी खेळापुढे पुण्याच्या खेळाडूंना हार मानावी लागली.

किशोरी गटाच्या लढतीत सांगलीने कोल्हापूरवर 44-23 अशी मात केली. मध्यंतराला सांगलीकडे 26-15 अशी आघाडी होती. सांगलीच्या श्रावणी भोसले, श्लोका पानबुडे यांनी जोरदार खेळ केला. त्यांना रिया हिप्परकर, अनिषा पवार हिने सुरेख पकडी घेत चांगली साथ दिली. कोल्हापूरच्या समृध्दी बनसोडे व अलहिदा शेख यांनी खोलवर चढाया करत चांगला प्रतिकार केला. तर स्वामिनी गावडे व अक्षता कामथे यांना सांगलीच्या आक्रमणाला थोपवता आले नाही. त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

नेहा, समीक्षाची चमकदार कामगिरी

परभणी संघाने पुणे संघावर 35-34 असा निसटता विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला परभणी संघ 16-21 असा पिछाडीवर होता. मात्र मध्यंतरानंतर नेहा राठोड व समीक्षा तरे यांनी केवळ बोनस गुणांवर खेळ करत आपल्या संघाची पिछाडी भरुन काढली. त्यांना विशाखा पोलेने उत्कृष्ठ पकडी घेत साथ दिली. पुण्याच्या श्रावणी सावंतने चांगल्या चढाया केल्या. सुजाता पवार व तनिष्का सिंग यांना मात्र त्यांना परभणीचे आक्रमण थोपवण्यात यश न आल्याने त्यांना केवळ एक गुणाने पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या उपउपांत्य सामन्यात मुंबई उपनगर संघाने मुंबई शहर संघावर 26-24 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.

बातम्या आणखी आहेत...