आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कबड्डी स्पर्धा:3 डिसेंबरपासून परभणीत रंगणार, स्पर्धेची गटवारी जाहीर, औरंगाबादचे संघ 'इ' व 'फ' गटामध्ये

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी संघटना व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या सहकार्याने 49 व्या कुमार/कुमारी गट आंतर जिल्हा अजिंक्यपद असे स्पर्धेचे नाव आहे. तसेच या स्पर्धेचे आयोजन 3 ते 6 डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे.

ही स्पर्धा स्व. माणिकराव गुट्टे क्रीडानगरी, जायकवाडी वसाहती समोर, कोद्री रोड, गंगाखेड (परभणी) येथे पार पडतील. गुरुवारी स्पर्धेची गटवारी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी जाहीर केली. औरंगाबादच्या मुलांच्या संघाचा समावेश इ' गटात आणि मुलींच्या संघाचा समावेश 'फ' गटामध्ये करण्यात आला आहे.

स्पर्धेत 38 संघांचा सहभाग :

या स्पर्धेत एकूण 38 मुलामुलींच्या संघांनी सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेतील लढती मातीच्या 6 क्रीडांगणावर होतील. गतवर्षी कुमार गटात कोल्हापुरने मुंबई उपनगरला पराभूत करत जेतेपद मिळविले होते, तर कुमारी गटात पालघरने पुण्याचा पराभव करीत पहिल्यांदाच विजेतेपद राखले होते. यंदाही बलाढ्य संघ सहभागी झाल्याने स्पर्धेत रोमांचक सामने पहायला मिळतील. यंदा दोन्ही गटातील संघाची 6-6 साखळी गटात विभागणी करण्यात आली आहे. तसेच स्पर्धा प्रथम साखळी पद्धतीने त्यानंतर बाद पद्धतीने खेळवण्यात येईल.

स्पर्धेची गटवारी पुढीलप्रमाणे :

कुमार गट :

 • अ गट- कोल्हापूर, बीड, मुंबई शहर, उस्मानाबाद.
 • ब गट - मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, धुळे.
 • क गट - पालघर, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग.
 • ड गट - परभणी, पुणे, जळगाव, जालना.
 • इ गट - अहमदनगर, रायगड, औरंगाबाद, सोलापूर.
 • फ गट - सांगली, रत्नागिरी, लातूर, नांदेड, हिंगोली.

कुमारी गट :

 • अ गट - पालघर, नाशिक, सोलापूर, जालना.
 • ब गट - पुणे, नांदेड, कोल्हापूर, उस्मानाबाद.
 • क गट - सांगली, रत्नागिरी, बीड, जळगाव.
 • ड गट - मुंबई शहर, अहमदनगर, सिंधुदुर्ग, हिंगोली.
 • इ गट - मुंबई उपनगर, ठाणे, लातूर, सातारा.
 • फ गट - औरंगाबाद, रायगड, परभणी, धुळे, नंदुरबार.
बातम्या आणखी आहेत...