आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभंग-भजन स्पर्धा:कारागृहातील बंदीजनांसाठी राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा; अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राज्यातील पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व अशा चार विभागात होणार असून २७ संघ सहभागी झाले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम विभागाची स्पर्धा २० ते ३० मे, दक्षिण विभागाची १ ते १० जून, मध्य विभागाची ११ ते २० जून आणि पूर्व विभागाची स्पर्धा २१ ते ३० जून दरम्यान प्रत्येक कारागृहात होणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने एका ही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. स्पर्धेसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब मोरे (देहूकर), विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे, देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सहभागी स्पर्धकांना सादरीकरणासाठी २५ मिनिटांचा वेळ दिला जाणार असून चार रचना सादर कराव्या लागतील. पत्रकार परिषदेत पंडित रघुनाथ खंडाळकर, प्रा. सगीरा शेख, प्रा. शिवानी अबनावे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...