आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्ये भरणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन:कला सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करणार; अब्दुल सत्तारांनी घेतला आढावा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये होणार आहे. एक जानेवारी रोजी या महोत्सवाचे आयोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचा सहभाग असणार असून चारही कुलगुरु या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत दिली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत विवीध यंत्रणेची आढावा बैठक घेतली.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, कृषी सहसंचालक दिनकर जाधव, उदय देवळाणकर यांच्यासह कृषी विभागासह विवीध विभागाचे अधिकारीअधिकारी उपस्थित होते.

600 स्टॉलचे असणार नियोजन

याबाबत राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी सांगितले की या महोत्सवाच्या माध्यमातून विवीध तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यत पोहोचले जावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये करण्यात येणारे विवीध बदल शेतीमध्ये अत्याधुनिक सामुग्री आणि त्यामाध्यमातून पीक पद्धती यासह विवीध बदलासाठी शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 600 स्टॉल असणार आहेत.

विवीध चर्चासत्राचे केले जाणार नियोजन

चव्हाण यांनी सांगितले की या महोत्सवात शेती आणि कृषी आधारीत उद्योगाच्या संदर्भात विवीध चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात येणार आहेत.राज्यातले तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.आधुनिक शेती आणि शेतमालावार प्रक्रिया उद्योग यासह विवीध विषयावर या प्रदर्शनात चर्चा केली जाणार आहे.

5 दिवस सिल्लोड महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवानंतर पाच दिवस सिल्लोड महोत्सवाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. यामध्ये कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...