आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्यातर्फे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ९ पदके आपल्या नावे केले. यात २ रौप्य व ७ कांस्यपदकांचा समावेश आहे.
यंदा छत्रपती संभाजीनगरला या स्पर्धेत एकही सुवर्णपदक जिंकला आले नाही. कोरोनानंतरचा परिणाम अद्यापही खेळाडूंवरच्या सरावावर जाणवत आहे. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्या खेळाडूंचे वडगावचे (को) सरपंच सुनील काळे, हनुमान भोंडवे, राज्य संघटनेचे दत्ता आफळे, जिल्हा क्रीडाधिकारी बाजीराव देसाई आदींनी अभिनंदन केले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
रौप्य पदक - रिया निलेश पाटील (लिटिल एंजल स्कूल), प्रतीक संजय मुसळे (ज्ञानभवन इंग्लिश स्कूल). कांस्यपदक - मृगजा गोमदे (स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर), श्रुतकीर्ती खलाटे (ऑर्चिड टेक्नो स्कूल), भक्ती लोमटे (अल्फोन्सा इंग्लिश स्कूल), पल्लवी जाधव (सरस्वती भुवन महाविद्यालय), चेतन समींद्रे (स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर), ऋषीकेश पुंड (भोंडवे पाटील स्कूल), संस्कार मुसळे (ज्ञानभवन इंग्लिश स्कूल).
आणखी तयारी हवी
कोरोनाच्या विश्रातीनंतर खेळाडूंच्या खेळावर परिणाम झाला आहे. त्यांना पुन्हा एकदा लय मिळवण्यासाठी आणखी कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्यांना जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्यास मिळाल्या तर त्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. आपण कोठे कमी पडतो याची कल्पना खेळाडूंना स्पर्धेतून होते. आपल्यातील कमजोर बाबींवर त्यांना काम करता येते, असे मत प्रशिक्षक भीमराज रहाणे यांनी व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.